मैदान भाड्याने घेण्याकरिता ऑनलाईन अर्ज

यवतमाळ येथील शासकीय मैदान अस्थायी पद्धतीने मर्यादित कालावधी करिता भाड्याने घेण्याकरिता खालील अर्ज भरा

यवतमाळ येथील शासकीय मैदान अस्थायी पद्धतीने मर्यादित कालावधी करिता भाड्याने घेण्याकरिता खालील अर्ज भरा

अर्ज दिनांक:


सूचना :

 

१. अर्ज दाखल केल्या नंतर तीन दिवसात उ. वि. अ. यवतमाळ यांचे कार्यालयात सदर अर्जाच्या चार प्रती आवश्यक कागदपत्रासह मैदान भाडे अर्ज फी १००० रुपये शासकीय खजिन्यात भरणा करण्याकरिता संपर्क साधावा. त्यानंतर नाहरकत प्रमाणपत्र या कार्यालयामार्फत मागविण्यात येईल. भूभाडे भरताना अर्ज फी आकारणी भाड्यातून वजा करण्यात येईल.नाहरकत प्रमाणपत्र नकारात्मक अभिप्राय असल्यास अथवा प्राथ्यम्य क्रमाने मैदान उपलब्ध झाल्यास अर्ज फी १००० रुपये शासकीय खजिन्यात सरकार जमा होईल सदर रक्कम ना-देय आहे.(परत मिळणार नाही) 
२. पडताळणी अंती अर्ज पात्र ठरल्यास शासन निर्णय दिनांक ०३-०३-२००७ व माननीय उच्च न्यायालयाचे आदेश दिनांक १७-०४-२०१८ नुसार अटी-शर्तीवर परवानगी देण्यात येईल.
३. कुठल्याही परिस्थितीत परवानगी देण्याचा अथवा नाकारण्याचा अधिकार हा उ. वि. अ. यवतमाळ यांचा राहील.
४. अधिक माहिती करिता आणि अर्ज/परवानगी चे नियम जाणून घेण्याकरिता येथे क्लिक करा-  शासन निर्णय दिनांक ०३-०३-२००७ व माननीय उच्च न्यायालयाचे आदेश दिनांक १७-०४-२०१८ व माननीय जिल्हाधिकारी यवतमाळ यांचे आदेश क्र.क.ली./राजस्व -२/का.वि./५१४/२०१८ दि.१६/०८/२०१८ व माननीय जिल्हाधिकारी यवतमाळ यांचे आदेश क्र.अ.का ./राजस्व -२/का.वि./398/2023  दि.25/04/2023 

५.सदर जागेवर विद्युत लाईन घेण्यास हरकत नाही,तरी कोणतीही हानी होणार नाही याची दक्षता घेईल  / झाल्यास आवेदक जबाबदार राहील .

           माननीय जिल्हाधिकारी यवतमाळ यांचे आदेश क्र.क.ली./राजस्व -२/का.वि./५१४/२०१८ दि.१६/०८/२०१८ नुसार अटी शर्ती ला अधीन राहून मंजुरी प्रदान केल्यावरून संबधितांना या अटी व शर्ती चे पालन करणे सुद्धा बंधनकारक आहे

१.शासकीय कर्यक्रम / नैसर्गिक आपत्ती / कायदा व सुव्यवस्था या बाबी उद्भवल्यास देण्यात आलेली परवानगी कोणत्याही वेळी रद्द करण्याचे अधिकार उपविभागीय अधिकारी यवतमाळ यांना राहील.

२.विवाह सोहळा, स्वागत समारंभ,धार्मिक व सांकृतिक कार्यक्रम,सभा,सम्मेलने,प्रबोधनपर कार्यक्रम,ऑर्केस्ट्रा,इत्यादी प्रयोजनार्थ 7000 चौ. मीटर  एवढी मोकळी जागा आझाद मैदान येथील भूभाडे आकारून देण्यात येईल, जागेचा वापर कमी जास्त प्रमाणांत असेल तरी सुध्दा संपुर्ण मैदानाचे भाडे शासनास अदा करावे लागेल.

३. क्रीडा स्पर्धा व इतर सार्वजनिक प्रयोजनार्थ  करिता १०० x १०० चौ. मिटर एवढी मोकळी जागा समता मैदान येथील भूभाडे आकारून देण्यात येईल,

४. आझाद मैदान या जागेमध्ये मोर्चेकरी, उपोषण धारक यांचेकरिता जागा आरक्षित आहे.

५.ज्या अर्जदारास भाडेतत्वावर मैदान उपलब्ध करून देण्यात आले आहे त्या अर्जदाराने दुसऱ्या व्यक्तीस परस्पर मैदान उपलब्ध करून दिल्याचे निष्पन्न झाल्यास अर्जदार फौजदारी कार्यवाहीस पात्र राहील.

६. संपूर्ण आझाद मैदान एका व्यक्तीला प्रदर्शनी / क्राफ्ट बाजार याकरिता उपलब्ध होणार नाही,परंतु वेयक्तिक दुकानाकरिता नकाशा नुसार १ दुकान लावण्याकरिता मोकळी जागा उपलब्ध करून देण्यात येईल.

७.मा.जिल्हाधिकारी यांचे आदेश दि.१०/०३/२०२२ नुसारआझाद मैदान समता मैदान हे ऐतिहासिक मैदान आहेत यांचे पावित्र्य राखण्याकरिता स्वच्छता,देखभाल,अतिक्रमण हटविणे करिता हस्तांतरित केले असून जर संपूर्ण समता मैदान भाड्याने आवश्यक असेल / आझाद मैदान यातील दुकानापुरती जागा भाड्याने पाहिजे असेल तर प्रथम मुख्याधिकारी न.प. यवतमाळ यांचे अर्ज करून त्यांचे नाहरकत प्रमाणपत्र अर्ज करतेवेळी अर्जात देण्यात आलेल्या चारित्र्य प्रमाणपत्रा सोबत जोडने बंधनकारक आहे.

८. राष्ट्रीय कार्याबाबत जनजागृती करण्याचे उद्देशाने आणि आपले दुकान क्रमांक व नावासह बॅनर लावणे आवश्यक आहे.

९.प्रत्येक दुकानात आकस्मिक आग विझविण्याचे साहित्य जसे वाळू,पाणी,फायर डीस्टिंगविशर ठेवण्याची व्यवस्था करावी व आपत्ती होणार नाही याची दक्षता घेण्यात यावी,झाल्यास अर्जदार जबाबदार राहील.

१०.दि.२६ जानेवारी रोजी प्रजासत्ताक दिन निमित्त शासकीय कार्यक्रम समता मैदान येते आयोजित करण्यात येत असतो या कार्यक्रमाकरिता पोलीस विभाग तयारी करीत असल्याने त्यांना तालीमकरीता सदर मैदान दि. २० जानेवारी ते २६ जानेवारी पर्यंत राखीव ठेवण्यात येईल.

टीप:- फोटोची (jpeg) साइझ कमीत कमी ५० KB ते जास्तीत जास्त १०० KB असावी व कागदपत्रांची (pdf) साईझ कमीत कमी १०० KB ते जास्तीत जास्त ३०० KB असवी.

प्रत :- १). मा. जिल्हा दंडाधिकारी तथा जिल्हाधिकारी यवतमाळ यांना माहितीस सविनय सादर  

         २). मा.जिल्हा पोलीस अधीक्षक यांना माहितीस सविनय सादर  

         ३).  १.तहसीलदार यवतमाळ २.मुख्याधिकारी नगरपरिषद यवतमाळ. ३.ठाणेदार शहर पोलीस स्टेशन यवतमाळ 

          आपली उपरोक्त ठिकाणच्या मंजुरात दिलेल्या दुकानच्या स्थळी वरील अटी व शर्ती चे पालन होत असल्याची शहनिशा करण्याची जबाबदारी राहील या बाबत वेळोवेळी तपसण्या करणे उल्लंघन होत असल्यास संबधितांवर आवश्यक ती कार्यवाही करावी  व याबाबत अनुपालन अहवाल सादर करावा.   


मैदान भाड्याने घेण्याकरिता मालमत्तेची माहिती




अर्जदाराची माहिती


सूचना : अर्जदाराचे चारित्र प्रमाणपत्र हे अर्ज (आज दिनांक 30/05/2023 रोजी) भरतेवेळी मागील १ वर्षाच्या आतील असावे, म्हणजेच अर्जदाराचे चारित्र प्रमाणपत्र हे अर्ज (आज दिनांक 30/05/2023 रोजी) भरतेवेळी 30/05/2022 या तारखेचे अथवा 30/05/2022 या तारखेनंतर चे हवे, 30/05/2022 च्या आधीचे प्रमाणपत्र ग्राह्य धरले जाणार नाही. तसेच अर्जदाराचे चारित्र प्रमाणपत्र हे जिल्हा पोलीस अधीक्षक (जि. पो. अ.) यवतमाळ यांचे कडूनच प्राप्त केलेले असावे.

© Copyright 2023