मैदान भाड्याने घेण्याकरिता ऑनलाईन अर्ज

यवतमाळ येथील शासकीय मैदान अस्थायी पद्धतीने मर्यादित कालावधी करिता भाड्याने घेण्याकरिता खालील अर्ज भरा

यवतमाळ येथील शासकीय मैदान अस्थायी पद्धतीने मर्यादित कालावधी करिता भाड्याने घेण्याकरिता खालील अर्ज भरा

अर्ज दिनांक:


सूचना :

1. अर्ज दाखल केल्या नंतर तीन दिवसात उ. वि. अ. यवतमाळ यांचे कार्यालयात सदर अर्जाच्या प्रतीसह मैदान भाडे खर्च भरण्या करिता संपर्क साधावा.
2. पडताळणी अंती अर्ज पात्र ठरल्यास शासन निर्णय दिनांक ०३-०३-२००७ व माननीय उच्च न्यायालयाचे आदेश दिनांक १७-०४-२०१८ नुसार अटी-शर्तीवर परवानगी देण्यात येईल.
3. कुठल्याही परिस्थितीत परवानगी देण्याचा अथवा नाकारण्याचा अधिकार हा उ. वि. अ. यवतमाळ यांचा राहील.
4. अधिक माहिती करिता आणि अर्ज/परवानगी चे नियम जाणून घेण्याकरिता शासन निर्णय दिनांक ०३-०३-२००७ व माननीय उच्च न्यायालयाचे आदेश दिनांक १७-०४-२०१८ या संकेतस्थळाला भेट द्या.

5.सदर जागेवर विद्युत लाईन घेण्यास हरकत नाही,तरी कोणतीही हानी होणार नाही याची दक्षता घेईल  / झाल्यास आवेदक जबाबदार राहील .

           माननीय जिल्हा दंडाधिकारी यवतमाळ यांचे आदेश क्र.१७५२/२०२० दि.०४/११/२०२० नुसार खालील अटी शर्ती ला अधीन राहून कार्योत्तर  मंजुरी प्रदान केल्यावरून संबधितांना या अटी व शर्ती चे पालन करणे बंधनकारक आहे

1.आझाद मैदान / समता मैदान यवतमाळ येथे मंजुरी मिळालेल्या स्वेटर / फटाका दुकानच्या / इतर दुकानाच्या ठिकाणी गर्दी होणार नाही याची संबधित दुकानदारांनी / संबधित आयोजकांनी दक्षता घ्यावी.

2.आझाद मैदान यवतमाळ येथे मंजुरी मिळालेल्या स्वेटर / फटाका दुकानदार / इतर  दुकानदार यांनी दुकानामध्ये येणाऱ्या प्रत्येकाचे थर्मल स्क्रीनिंग करणे बंधनकारक राहील.

3.स्वेटर / फटाका दुकानामध्ये सामाजिक अंतर (Social Distancing ) राहील याबाबत दक्षता घ्यावी.तसेच दुकानामध्ये येणाऱ्या व्यक्ती मध्ये  सामाजिक अंतर (Social Distancing ) ठेवणे आवश्यक राहील.

4.स्वेटर / फटाका दुकानामध्येसर्वांनी मास्क चा वापर करणे बंधनकारक राहील तसेच दुकानामध्ये येणाऱ्या प्रत्येक ग्राहकांना मास्क वापरण्याबाबत प्रेरित करावे.

5.आझाद मैदान / समता मैदान  यवतमाळ येथे स्वेटर / फटाका दुकानास / इतर दुकानास परवानगी मिळाल्यानंतर कोरोना विषाणूचा संसर्ग पसरू नये या अनुषंगाने योग्य ती काळजी संबधित  दुकानदारांनी / संबधित आयोजकांनी घ्यावी .

6. आझाद मैदान यवतमाळ येथे स्वेटर / फटाका दुकानदार / इतर  दुकान मंजुरी करिता अर्ज करतेवेळी  कोरोना लसीकरणाचे प्रमानपत्र (नसल्यास  मागील ८ दिवसातील RTPCR Negative टेस्ट प्रमाणपत्र) अर्जात देण्यात आलेल्या चारित्र्य प्रमाणपत्रा सोबत जोडावे 

 

प्रत :- १). मा. जिल्हा दंडाधिकारी तथा जिल्हाधिकारी यवतमाळ यांना माहितीस सविनय सादर  

         २). मा.जिल्हा पोलीस अधीक्षक यांना माहितीस सविनय सादर  

         ३).  १.तहसीलदार यवतमाळ २.मुख्याधिकारी नगरपरिषद यवतमाळ. ३.ठाणेदार शहर पोलीस स्टेशन यवतमाळ 

          आपली उपरोक्त ठिकाणच्या मंजुरात दिलेल्या दुकानच्या स्थळी वरील अटी व शर्ती चे पालन होत असल्याची शहनिशा करण्याची जबाबदारी राहील या बाबत वेळोवेळी तपसण्या करणे उल्लंघन होत असल्यास संबधितांवर आवश्यक ती कार्यवाही करावी  व याबाबत अनुपालन अहवाल सादर करावा.   

 

 


मैदान भाड्याने घेण्याकरिता मालमत्तेची माहिती
अर्जदाराची माहिती


सूचना : अर्जदाराचे चारित्र प्रमाणपत्र हे अर्ज (आज दिनांक 20/10/2021 रोजी) भरतेवेळी मागील १ वर्षाच्या आतील असावे, म्हणजेच अर्जदाराचे चारित्र प्रमाणपत्र हे अर्ज (आज दिनांक 20/10/2021 रोजी) भरतेवेळी 20/10/2020 या तारखेचे अथवा 20/10/2020 या तारखेनंतर चे हवे, 20/10/2020 च्या आधीचे प्रमाणपत्र ग्राह्य धरले जाणार नाही. तसेच अर्जदाराचे चारित्र प्रमाणपत्र हे जिल्हा पोलीस अधीक्षक (जि. पो. अ.) यवतमाळ यांचे कडूनच प्राप्त केलेले असावे.

© Copyright 2021